4 हात आणि 4 पाय असलेली लेक, पण..
एका महिलेने 4 हात आणि 4 पाय असलेल्या मुलीला जन्म दिला आहे. यानंतर या घटनेची एकच चर्चा होत आहे.
बिहारच्या सारण शहरातील एका खासगी नर्सिंग होममध्ये ही घटना घडली.
प्रिया देवी या महिलेला छपरा येथील श्याम चक येथील खाजगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. येथे तिने एका मुलीला जन्म दिला. या मुलीला 4 हात आणि 4 पाय होते
जन्मानंतर तिला पाहिलेले डॉक्टरही थक्क झाले. या मुलीला सामान्य बाळापेक्षा जास्त अवयव होते. तिला चार कान, चार पाय, चार हात दिसत होते.
वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरात दोन हृदय आणि दोन पाठीच्या कण्या असल्याचे आढळून आले.
काही वेळातच त्याची माहिती रुग्णालयात वेगाने पसरली. यानंतर प्रसूती वॉर्डमध्ये या मुलीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती
मात्र, ऑपरेशनद्वारे जन्मलेल्या या चिमुरडीचा जन्मानंतर 20 मिनिटांनी मृत्यू झाला. मुलीच्या जन्मानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
प्रिया पहिल्यांदा गरोदर होती. मात्र, 9 महिने पूर्ण होऊनही प्रसूती न झाल्यामुळे तिचे नातेवाईक चिंतेत होते. डॉक्टरांनी तपासणीनंतर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.
अशी प्रकरणे फार कमी आहेत. गर्भाशयात एकाच अंड्यातून दोन मुले तयार होतात. या प्रक्रियेत दोघेही वेळेत वेगळे झाले तर जुळी मुले जन्माला येतात नाहीतर अशा मुलाचा जन्म होतो.