बर्फ गोळ्यासोबत गाण्याची मेजवानी!

उन्हाळ्याची चाहूल लागू लागली की थंड पेयाचे स्टॉल दिसू लागतात.

उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक पसंती बर्फ गोळ्याला असते. 

बीडमध्ये देखील बर्फ गोळ्याचा एक अनोखा स्टॉल आहे. 

बीड शहरातील माळीवेस परिसरामध्ये साई बर्फ गोळा प्रसिद्ध आहे. 

आकाश काटकर नावाचा तरुण हा बर्फ गोळ्याचा व्यवसाय करतो.

आकाश वर्षभर ऑर्केस्ट्रात गाणी गातो तर उन्हाळ्यात बर्फगोळा विकतो.

बर्फ गोळा खाताना ग्राहकांना गाण्याची मेजवानीही मिळते. 

आकाशच्या गाड्यावर बर्फ गोळ्याचे 40 प्रकारचे फ्लेवर आहेत.

10 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत या ठिकाणी बर्फ गोळे उपलब्ध आहेत. 

या बर्फ गोळ्याच्या स्टॉलवर खवय्ये मोठी गर्दी करत असतात.