आठवीच्या मुलानं बनविली सोलार इलेक्ट्रिक कार

जिद्द चिकाटी आणि नवीन काही तरी करण्याची धडपड असेल तर केलेल्या प्रयत्नांना यश मिळते.

नगर जिल्ह्यातील इयत्ता आठवीत शिकत असलेल्या सोहम शेणकर या विद्यार्थ्याने बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक कारचे मॉडेल बनविले आहे.

विशेष म्हणजे सोहमने प्लंबींगच्या साहित्याच्या उपयोग करून ही भन्नाट गाडी बनविली आहे. 

एका चार्जमध्ये ही गाडी 22 किलोमीटर एवढी धावते. 

सोहम सध्या अभिनव पब्लिक स्कूलला 8 वीच्या वर्गामध्ये शिकत आहे. सोहमची संशोधक म्हणून चौथीपासून सुरूवात झालेली आहे. 

 बॅटरी एकदा फूल चार्ज केली की ती 20-22 किलोमीटर जाते. कारला 20 चा स्पीड आहे.

सोहमचे पुढील स्वप्न आर्किटेक्ट अथवा इंजिनिअर व्हायचे, सोहमचे वडील नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. एकत्र कुटुंबात सोहमचे संगोपन होत आहे. 

भविष्यामध्ये दिवाळीच्या काळामध्ये लोखंडी पत्र्याची मोटारगाडी बनविण्याचा त्याचा मानस आहे.