75 व्हिंटेज कार करणार 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पर्यंत प्रवास
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 19 व्या शतकातील लक्ष्मी विलास पॅलेस मधील 75 व्हिंटेज कार 5 जानेवारी रोजी गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे रवाना होतील.
अमृत महोत्सव थीमवर आधारित कार्यक्रम 21 गन सॅल्यूट कॉन्कोर्स डी एलिगन्सच्या 10 व्या आवृत्तीच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी होणार आहे.
वडोदरा येथील राजवाड्यात 6-8 जानेवारी रोजी 21 गन सॅल्यूट कॉन्कोर्स डी एलिगन्स हा सोहळा होणार आहे.
21 गन सॅल्यूट हेरिटेज अँड कल्चरल ट्रस्टच्या प्रवक्त्याने माहिती दिली की ट्रस्टने पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कारमध्ये 1931 फोर्ड ए रोडस्टर, 1936 एडलर ट्रम्प, 1934 ऑस्टिन सेव्हन, 1936 डॉज डी 2 कन्व्हर्टेबल सेडान, 1965 शेवरलेट इम्पाला आणि 1948 हंबर यांचा समावेश आहे.
लक्ष्मी विलास पॅलेसच्या आवारात 1911 नेपियर, 1930 कॅडिलॅक आणि इतर दुर्मिळ गाड्यांसह दोनशे व्हिंटेज कार प्रदर्शित केल्या जातील.
दिल्ली आणि शेजारच्या शहरांमध्ये एक दशकाहून अधिक काळ प्रदर्शने आयोजित केल्यानंतर हा कार्यक्रम वडोदरा येथे स्थलांतरित होत आहे.
वडोदराच्या राजघराण्याचे पूर्वीचे निवासस्थान असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आयोजित केला जाईल, असं आयोजकांनी सांगितलं.