900 वर्ष जुन्या परंपरेनं सिद्धेश्वर यात्रेला सुरूवात

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे.

परंपरेप्रमाणे तैलाभिषेक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरी कुंभार कुटूंबीयांकडून आदण म्हणून हिरेहब्बू कुटूंबांकडे 56 मातीच्या घागरी देण्यात आल्या आहेत. 

गेल्या 900 पेक्षा अधिक वर्षांपासून ही परंपरा कुंभार परिवारातर्फे करण्यात येत आहे.

कुंभार वाड्यात बुधवारी गणपती आणि सिद्धेश्वरांच्या प्रतिमाचे पूजन करून 5 दिवसाचे मानाचे दिवे बसवण्यात आले. यावेळी 56 मातीच्या घागरी पैकी प्राथमिक स्वरूपात 7 घागरींची यावेळी पूजा करण्यात आली.

 यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे महादेव कुंभार यांनी या घागरी सुपूर्द केल्या. 

मुख्य काठ्यांच्या उपस्थितीत 68 लिंगांना तैलाभिषेक सोहळा पार पडण्यासाठी या 56 घागरींना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यंदाची यात्रा सिद्धरामेश्वराच्या कृपेने चांगली होईल अशी भावना मानकरी महादेव मैत्री कुंभार यांनी व्यक्त केली.