भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकणारे अग्रगण्य नेते म्हणून महात्मा गांधीची ओळख आहे.
भारतासारख्या देशाने महात्मा गांधी ही अमूल्य भेट जगाला दिली आहे.
गांधी ज्या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादा विरोधात लढले त्याच इंग्लडमध्ये त्यांचा पुतळा आहे.
वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी वास्तव्यास होते.
आता सेवाग्राम आश्रम जगासाठी प्रेरणास्थान आणि ऊर्जास्थान बनलेला आहे.
आज गांधीजी नसले तरी आश्रमाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक, अभ्यासक येत असतात.
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आश्रम पाहायला आणि समजून घ्यायला येत असतात.
सेवाग्राम आश्रम आजही त्याच सुस्थितीत असून दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत.
सेवाग्रामात नित्यनेमाने कार्यशाळा, संमेलने, प्रशिक्षण कार्यक्रम होत असतात.
एप्रिल 2022 ते मार्च 2023 या काळात तब्बल 2 लाख 26 हजार 355 पर्यटकांनी आश्रमाला भेट दिली.
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राजदूत, खासदार, आमदार यांनीही आश्रमाला भेट दिली.
महात्मा गांधींच्या नात सुमित्रा गांधी कुळकर्णी व तारा गांधी भट्टाचार्य यांच्याही नोंदी आश्रमात आहेत.
महात्मा गांधींचे वास्तव्य राहिलेला वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे.
महात्मा गांधींचा वारसा जपणारं सेवाग्राम!
Click Here