राज्याच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात महिलांना सवलत दिली आहे.
बस प्रवास भाड्यात महिलांना तब्बल 50 टक्के सवलत मिळत आहे.
राज्यात 17 मार्चपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
या योजनेला महिला वर्गाचा चांगला पाठिंबा मिळत आहे.
लातूर जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख 25 हजार 694 महिलांनी लाभ घेतला.
MSRTC ची साधी बस, मिनी बस, निमआराम बससाठी ही सवलत आहे.
शिवशाही, शिवनेरी, शिवाई आणि इतर सर्व बस प्रवास सवलतीत होत आहे.
महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे.
महिला सन्मान योजनेचे महिला वर्गातून स्वागत होत आहे.