मराठवाड्यातील लातूर हा दुष्काळी जिल्हा असला तरी येथील प्रमुख व्यवसाय शेतीच आहे.
डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात लातूर संपूर्ण देशात आघाडीवर आहे.
लातूर जिल्ह्यात तूर, हरभरा, उडीद आणि मूग ही डाळवर्गीय पिके प्रामुख्याने घेतली जातात.
लाल रंगाच्या तुरीचे आगर म्हणून ‘लातूर’ नाव पडल्याचेही सांगितले जाते.
महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, कर्नाटकातूनही तूर आणि इतर शेतमाल विक्रीसाठी लातुरात येतो़.
लातूरमध्ये डाळ निर्मितीचे 150 प्रकल्प असून ही संख्या मराठवाड्यात सर्वाधिक आहे.
या प्रकल्पासाठी दररोज 45 ते 50 हजार क्विंटल तुरीची खरेदी केली जाते.
लातूरमधील विविध मिलमधून दररोज 30 हजार क्विंटल अर्थात 3 हजार टन डाळ तयार होते.
लातूरची डाळ आंध्र प्रदेशातील कर्नुलपासून तमिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पाठवली जात आहे.
लातूरच्या डाळ उद्योगातून 15 हजार मजुरांना रोजगाऱ़ मिळत असून हमाल, मापाड्यांची संख्या वेगळी आहे.
ठिबक सिंचनासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड!
Click Here