नव्या रुपातील लाल परी देणार ट्रॅव्हल्सला टक्कर!

आणखी पाहा...!

राज्य परिवहन महामंडळाची बस ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. 

गेल्या कित्येक वर्षांपासून एसटी बस प्रवाशांची सेवा करत आहेत.

आता एसटी नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. 

अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रवाशांना लक्झरी सेवा नवीन बसमध्ये मिळणार आहेत. 

राज्यभरातील विविध आगारांत नव्या रुपातील लाल परी दाखल होत आहेत. 

आता एसटीतून आरामदायी आणि सुरक्षित प्रवास होणार आहे. 

आकर्षक लुक असणाऱ्या या बसमध्ये विविध सुविधाही देण्यात आल्या आहेत. 

बीएस 6 या नवीन रुपातील 10 बस बीड जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. 

या बसमध्ये प्रवाशांसाठी चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.

आपत्कालीन स्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी तीन ठिकाणी व्यवस्था आहे.

नव्या रुपातील लाल परीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.