महाराष्ट्रातील पहिला कंदमूळ महोत्सव
कोल्हापुरात महाराष्ट्रातील पहिला कंदमुळांचा उत्सव भरवण्यात आला होता.
निसर्ग अंकुर, श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब कोल्हापूर, युथ ऍनेक्स, वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या सहकार्याने कंदमुळांचा उत्सव भरवण्यात आला होता.
काय होता हेतू?
निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात.
रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीय यांच्याकडे आहे.
अशा प्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर, याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी.
शेतकऱ्यांनी कंदमुळांची लागवड त्यांच्या शेतात करण्यासाठी प्रोत्साहित व्हावे हा या उत्सवाचा मागचा मुख्य हेतू होता, अशी माहिती आयोजक मधुकर बाचूळकर यांनी दिली.
कोणत्या कंदमुळांचा होता समावेश?या उत्सवामध्ये कणगा, काटे कणग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी, शेवळा, सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे, कंदीका
आणि कंदक तसेच मोठा कासार अळू, काळा अळू, हिरवा अळू, पांढरा पेरव, उंडे, शेडवाळे असे अळूंचे विविध प्रकारचा समावेश होता.