तब्बल 21 हजार रुद्राक्षांपासून बनवलं खास जॅकेट, आरोग्यालाही आहे फायदा!
नाशिकच्या अरविंद बनकर यांनी चक्क रूद्राक्षापासून जॅकेट तयार केलंय.या जॅकेटची बाजारात चांगलीच चर्चा आहे.
अरविंद बनकर यांची रुद्र ज्योती संस्था आहे. त्यांना लहानपणापासूनच रुद्राक्षाच्या विविध वस्तू बनवण्याचा छंद आहे.
त्यांंनी नुकतंच रुद्राक्षापासून जॅकेट तयार केलंय. यामध्ये त्यांनी जवळपास 21 हजार रुद्राक्ष वापरली आहेत.
हे सर्व पंचमुखी रुद्राक्ष असून त्यांनी ते नेपाळमधून आणले आहेत.
बनकर यांनी या जॅकेटची डिझाईन अत्यंत सुदर प्रकारे केलीय. त्यांनी यामध्ये अतिशय बारकाईन विणकाम केलंय.
हे जॅकेट बनवण्यासाठी त्यांना 25 दिवस लागले आहेत.
किती आहे किंमत?
बाजारातील एखाद्या सामान्य जॅकेटची किंमत दोन ते तीन हजार रुपये असते.
हे जॅकेट संपूर्णपणे रुद्राक्षांपासून बनवले आहे. हे सर्व रुद्राक्ष ओरिजनल आहेत. कोणतेही बनावट रुद्राक्ष यामध्ये वापरलेले नाही. या रुद्राक्षांची किंमत सध्या जास्त आहे.
त्यामुळे सर्व खर्च आणि बनवण्याची मजुरी धरून या जॅकेटची किंमत 51 हजार रुपये इतकी असल्याची माहिती बनकर यांनी दिली.