थंडीचा हा उपाय
ठरू शकतो जीवघेणा
थंडीपासून बचावासाठी बरेच उपाय केले जातात.
पण काही उपाय करताना एखादी चूक तुमच्या जीवावर बेतू शकतो.
थंडी पळवण्यासाठी केला जाणारा असाच एक उपाय म्हणजे शेकोटी.
थंडीपासून बचाव करताना शेकोटी पेटवल्याने
काही लोकांचा जीव गेला.
शेकोटी पेटवल्यानंतर
त्यांनी केलेली एक चूक
जीवघेणी ठरली.
हे लोक दारे-खिडक्या बंद करून घरात शेकोटी पेटवून झोपी गेले.
शेकोटीचा धूर
घरातच कोंडला आणि
श्वास गुदमरून मृत्यू झाला.
या लोकांनी जी चूक केली ती तुम्ही करू नका.
त्यामुळे तुम्हीही शेकोटी पेटवत असाल तर यापुढे सावधान!