रात्री दही का खाऊ नये?

दहीमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

परंतु अनेकदा रात्री दही खाऊ नये असा सल्ला दिला जातो.

तेव्हा रात्री दही किंवा त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ का खाऊ नये हे जाणून घेऊयात.

हेल्द एक्स्पर्टनुसार रात्रीच दही खाल्याने शरीराचे नुकसान होत नाही. 

परंतु ज्या लोकांना पचनाशी संबंधित काही त्रास असतो अशा लोकांनी रात्री दही खाल्यास त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होतात.

दही हा पदार्थ फॅट्स आणि प्रोटीनने भरपूर असलेला डेअरी प्रोडक्ट आहे, ज्याला पचवण रात्रीच्या वेळी थोडं अवघड असत.

रात्रीच्यावेळी शरीरातील मेटाबॉलिज्म खूप हळू काम करत असत. यामुळे आपले पाचनतंत्र देखील हळू काम करते.

आयुर्वेदानुसार रात्री दही खाल्याने कफ होण्याची शक्यता असते.

अस्थमा, खोकला आणि सर्दी सारखे आजार असलेल्या लोकांनी रात्री दही खाऊ नये.

रात्री दही खाण्याऐवजी ते सकाळी अथवा दुपारच्या जेवणात खावं.