विहीर नेहमी गोलाकारच का असते?
पूर्वी लोक पाण्यासाठी केवळ नदी आणि तलावांवर अवलंबून असायची. मात्र त्यानंतर माणसांनी विहीर खोदून त्यातून पाणी काढणे सुरु केले.
आता शहरात या विहिरी दुर्मिळ झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात मात्र अजूनही लोक पिण्याच्या पाण्यासाठी या विहिरींवर अवलंबून असतात.
परंतु या विहिरी गोलाकारच का असतात, त्यांचा आकार हा त्रिकोणी अथवा चौकोनी का असत नाही? असा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल.
तेव्हा विहिरी या गोलाकार का असतात याचे शास्त्रीय कारण जाणून घेऊयात.
विहीर वर्तुळाकार असणं मजबुतीच्या दृष्टीने आवश्यक असत. कारण विहिरीत जे पाणी साठतं त्या पाण्याचा दाब सभोवतालच्या भिंतीवर समसमान पडतो, जेणेकरून भोवतालच्या गोलाकार भिंतींवर कोणताही ताण येत नाही.
याउलट विहीर चौरसाकृती किंवा आयताकृती बांधली तर आतल्या पाण्याचा दाब हा चार कोपर्यांवर येईल आणि तो पाण्याचा दाब सहन न झाल्याने विहिरीचे चारही कोपरे ढासळण्याची शक्यता जास्त असते.
विहीर गोलाकार असल्याने पाण्याच्या दबावामुळे विहीर ढासळणं नाही, पण मातीची झीजदेखील होत नाही.
गोलाकार विहीर खोदणं हे चौरसाकृती किंवा आयताकृती विहीर खोदण्यापेक्षा तुलनेने सोपं आहे.
त्याउलट आयताकृती किंवा चौरसाकृती विहीर खोदणं कठीण आहे.