रात्री केळ का खाऊ नये?

केळी हे एक सुपरफूड आहे. ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.

केळी अनेक खनिजांसोबत ऊर्जेचे ही स्रोत असल्याने बऱ्याच जणांना केळ हे फळं खूपच आवडत.

परंतु बऱ्याच जणांकडून रात्री केळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामागचं नेमकं कारण जाणून घेऊया.

केळ हे फळ कफ वाढवणारे मानले जाते.

रात्री केळी खाल्ल्यास कफ, खोकला, छातीत दुखणे इत्यादी समस्या होऊ शकतात.

दूध आणि केळी एकत्र खाऊ नये यामुळे पचनसंस्था बिघडू शकते. त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात.

केळ खालल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. साधारण एक तासानंतर  पाणी प्यावे.

केळी पचनास जड असल्याने त्याच्यावर लगेच पाणी प्यायल्याने गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो.