टरबूज की खरबूज, आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर? 

उन्हाळा हा टरबूज आणि खरबूजाचा हंगाम असतो. 

टरबूज आणि खरबूज दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. 

उन्हाळ्यात हेल्दी राहण्यासाठी दोन्ही फळांचे सेवन करणे फायदेशीर असते. 

टरबूज आणि खरबूज दोन्हीमध्ये 90 टक्क्यापेक्षा जास्त पाणी असते. 

टरबूजापेक्षा खरबुजामध्ये जास्त प्रोटीन असते. 

टरबूज, खरबूज दोन्हीमध्ये कार्ब्सचे प्रमाण खूप कमी असते. 

टरबूजापेक्षा खरबुजामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात. 

टरबूज, खरबूज दोन्हीमध्ये व्हिटॅमिन डी आणि इ चे प्रमाण कमी असते. 

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी मात्र दोन्हीही तितकेच फायदेशीर असतात.