कुठलं Cooking oil वापरणं चांगलं?

हाय कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर तेल कमी खायला सांगितलं जातं. पण खूप कमी पदार्थ बिनातेलाचे असतात. 

काही तेलांच्या दीर्घकालीन वापरामुळे आपल्याला हाय ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक यासारख्या आजारांचा धोका असतो. 

जाहिरातींतून लो फॅट आणि हेल्दी असल्याचा दावा करणारी अनेक तेलं बाजारात मिळतात; पण ही तेलं शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचं  प्रमाण वाढवतात.

कोणत्या तेलात अनसॅच्युरेटेड फॅट आहे आणि कोणतं तेल आरोग्यासाठी चांगलं आहे, याबद्दल आहारतज्ज्ञांचं मत माहीत आहे?

ऑलिव्ह ऑइल हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. हे तेल तळणासाठी वापरायचं नसतं.

कॉर्न ऑइलमध्येही अनसॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण कमी असतं.

भारतीय स्वयंपाकात तळणीसाठी सनफ्लॉवर ऑइल वापरण त्यातल्या त्यात फायदेशीर.

पांढऱ्या मोहरीचं तेल आणि नट्स ऑईल शरीरासाठी उत्तम आहेत.

शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी जास्तीतजास्त फायबरयुक्त पदार्थ खा, जंक आणि फास्ट फूड खाणं टाळणं पाहिजे.

तळलेले तेलकट पदार्थ खायची सवय असेल तर ती सवय बदला. त्यामुळे तुमचं कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल.