श्रावणात उपवासाला काय खायचं आणि काय टाळायचं?

उपसावात रिकाम्या पोटामुळे पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे काही वेळांनी फळे खात राहा. 

उपवासात दिवसभर 7-8 ग्लास पाणी प्या. त्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल. 

द्राक्षे, संत्री, मोसंबी ही फळे जास्त खा, त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. 

उपवासात सुका मेवा खा. त्यातून अशक्तपणा जाणवत नाही. 

सकाळी नाष्ता करताना दूध आणि फळे खावीत. 

दही, साबुदाणा खिचडी, बटाट्याचे उपवासातील पदार्थ दुपारच्या जेवणात खा. 

दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. त्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. 

संध्याकाळी चहासोबत चिप्स, भाजलेले शेंगदाणे, मखाने आणि ड्रायफुड्स खा. 

तळलेले पदार्थ, पनीर, फुल क्रीम दूध खाऊ नका.