मधुमेह हा आजार आजकाल कॉमन बनत चाललाय. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरते. 

रक्तातील साखरेची पातळी वाढली की, अनेक आरोग्य समस्याही मागे लागतात. 

मधुमेहाच्या रुग्णांना दररोज निर्धारित कॅलरीज घेण्याचा सल्ला दिला जातो. 

मधुमेह जास्त असेल तर तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचे सेवन नियमित करा.

मधुमेही रुग्णांनी कच्ची केळी, लिची, डाळिंब, एवोकॅडो आणि पेरू यांचे सेवन करणे आरोग्यदायी ठरू शकते.

कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ म्हणजे - दही आणि दूध मर्यादित प्रमाणात घेणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांनी जेवणात जास्त मीठ घेऊ नये.

कोल्ड ड्रिंक्समुळे मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचते, त्यामुळे ते टाळायलाच हवेत.

जेवणात साखरेचा वापर कमीत कमी करा.

आईस्क्रीम, टॉफी, जंक फूड किंवा तेलकट पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात.