पाणी दिवसभरात
कधी आणि किती प्यावे?
पाणी हे आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. योग्य प्रमाणात दररोज पाण्याचे सेवन केल्यास शारीरिक व्याधी देखील दूर होतात.
परंतु दररोज पाणी कधी आणि किती प्यावे या गोष्टीची माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे. तेव्हा आपण याविषयीची माहिती जाणून घेऊयात.
सकाळी उठल्यावर 2 ग्लास पाणी प्यावे, ज्यामुळे किडनीचा त्रास होत नाही.
सकाळी व्यायाम केल्यावर 20 मिनिटांनंतर 2 ग्लास पाणी प्यावे, त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी कायम राहते, डिहायड्रेशन होत नाही.
आंघोळीच्या आधी पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास टळू शकतो.
चहा किंवा कॉफी प्यायच्या आधी पाणी प्यावे, ज्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होत नाही.
जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे, त्यामुळे जेवण पचनाची क्रिया सोपी होते. तसेच जेवण जेवताना केवळ दोन घोट पाणी प्यावे.
तुम्ही तणावपूर्ण वातावरणात काम करत असाल तर तुमचे मन आणि डोकं शांत ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन करा.
संध्याकाळचा नाश्ता करण्याआधी पाण्याचे सेवन केल्याने जास्त नाश्ता करता येत नाही त्यामुळे तुम्हाला रात्री भूक लागेल.
झोपण्याच्या आधी पाणी प्यायल्याने स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी असते.