निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फळांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे.  फळांमध्ये विविध प्रकारचे पोषक आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात.

पण, फळे किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी खावीत, याची अचूक माहिती असणेही महत्त्वाचे आहे. 

अनेकजण संध्याकाळी फळे न खाण्याचा सल्ला देतात, तर कोणी जेवणानंतर फळे खाऊ नयेत, असे म्हणतात. 

त्याचबरोबर अशी काही फळे आहेत जी, रिकाम्या पोटी खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. 

हेल्थलाईनच्या माहितीनुसार दिवसा आपण कधीही फळे खाऊ शकतो. 

फळे खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी राखण्यासाठी दुपारी 11 ते 12 या वेळेत फळे खावीत.

12 च्या सुमारास फळे खाल्ल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल, त्यामुळे दुपारच्या जेवणात कमी कॅलरीज खाल्ल्या जाऊ शकतात. 

जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढू शकतात, त्यामुळे जेवणानंतर फळे न खाण्याचा सल्ला दिला जातो.

गर्भधारणेदरम्यान फळे खाणे खूप महत्त्वाचे आहे. गरोदरपणात न्याहारीनंतर फळांचे सेवन करणे चांगले. 

ही फळे रिकाम्या पोटी खाऊ नका - केळी, नाशपाती, संत्रा, मौसंबी, आंबा, द्राक्षे, लिची