फोनचा ब्राइटनेस किती असावा?

सध्या जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन असतो.

सोशल मीडिया, युट्युब इत्यादींमुळे बरेचजण त्यांचा सर्वाधिक वेळ हा मोबाईल पाहण्यात घालवतात.

परंतु अनेकदा मोबाईल स्क्रीनच्या ब्राईटनेसमुळे डोळ्यांवर ताण येतो.

तेव्हा मोबाईल स्किनचा ब्राईटनेस किती असायला हवा हे जाणून घ्या.

बरेच लोक मानतात की ब्राइटनेस मिनिमम ठेवायला हवा. ज्यामुळे डोळ्यांवर कमी दाब पडतो.

तर काही लोक मानतात ब्राइटनेस वाढवून ठेवला पाहिजे. जेणेकरुन स्क्रीनवर लिहिलेलं वाचताना डोळ्यांवर जास्त दबाव पडू नये.

नेत्रतज्ज्ञांच्या मते यासाठी कोणताही सेट पॅटर्न नाही.

खूप कमी ब्राइटनेसमुळे तुम्हाला फोनवर खूप जोर द्यावा लागेल. त्याच वेळी, रात्रीच्या वेळी 50 टक्क्यांपेक्षा जास्त ब्राइटनेस डोळ्यांमध्ये समस्या निर्माण करते.

तेव्हा एका छोट्या गोष्टीची काळजी घेतल्यास फोनच्या ब्राइटनेसमुळे डोळ्यांना त्रास होण्यापासून वाचवता येते.

तज्ज्ञांच्या मते फोनची ब्राइटनेस नेहमीच आसपासच्या प्रकाशाच्या प्रमाणात असावी.

जसे की तुम्ही बाहेर जात असाल तर फोनची ब्राइटनेस वाढवा.

तर त्यातुलनेत रात्री फोनचा ब्राईटनेस हा अर्ध्यापेक्षा कमी करा.