सरोगसी म्हणजे काय?

एखादी स्त्री बाळाला जन्म देण्यास असमर्थ असेल किंवा तिला स्वतःला बाळाला जन्म द्यायचा नसेल तर ती सरोगसीचा आधार घेते.

एखादं जोडपं मूल जन्माला घालण्यासाठी दुसऱ्या स्त्रीचे गर्भाशय वापरते त्याला सरोगसी म्हणतात.

सरोगसीमध्ये एखादी स्त्री स्वत:च्या किंवा डोनरच्या एग्जद्वारे दुसऱ्या जोडप्यासाठी प्रेग्नंट होते. 

दुसऱ्याचं मूल आपल्या पोटात वाढवणाऱ्या स्त्रीला 'सरोगेट मदर' म्हणतात. 

स्त्रीच्या जिवाला धोका, वैद्यकीय समस्या, गर्भधारणेची समस्या ही सरोगसीची कारणे आहेत.

सरोगसीचे ट्रेडिशनल आणि जेस्टेशनल सरोगसी असे दोन प्रकार आहेत.

ट्रेडिशनल सरोगसीमध्ये डोनरच्या स्पर्म्सचं सरोगेट मदरच्या एग्जशी मीलन घडवलं जातं.

ट्रेडिशनल सरोगसीमध्ये सरोगेट मदर हीच बाळाची बायोलॉजिकल आई असते.

जेस्टेशनल सरोगसीमध्ये इच्छुक जोडप्याचे स्पर्म आणि एग्ज यांचं मीलन घडवलं जातं.

जेस्टेशनल सरोगसीमध्ये सरोगेट मदरचं बाळाशी कोणतेही जेनेटिक रिलेशन नसतं.