'फ्लिंग' अर्थात तात्पुरत्या रिलेशनशिपमध्येही असतात हे नियम, तुम्हाला माहितेयंत का?

अपेक्षा वास्तववादी ठेवणं आवश्यक आहे.

हे नातेसंबंध तात्पुरते आहेत, याची एकमेकांना स्पष्ट कल्पना द्यावी.

मित्र/मैत्रिणींचे एक्स किंवा सहकारी यांच्याशी डेटिंग करू नका.

तुमच्या भावनांना सामोरं जाऊन त्यांचं योग्य व्यवस्थापन करावं.

तुमच्या या नातेसंबंधांचं प्रदर्शन सोशल मीडियावर करू नका.

परस्परसंमतीने लैंगिक संबंध आल्यास सुरक्षिततेच्या साधनांचा वापर करा.

नातेसंबंध तात्पुरते असल्याने तुमच्या कुटुंबीयांना त्यात ओढू नका.

तात्पुरत्या नातेसंबंधांत काय अपेक्षित आहे, ते दोघांनीही ठरवणं आवश्यक.

तुम्ही अशा नातेसंबंधात असाल तर ते एंजॉय करा आणि त्यात तुम्हाला आनंद मिळत नाही आहे याची जाणीव झाल्यास ते संबंध तिथेच थांबवा

हे नातं संपवताना त्यात नकारात्मक भावना राहणार नाही, याची काळजी घ्या.