'चंद्रमुखी'तील 'चिराभरणी'चं
कटू सत्य

'चंद्रमुखी' फिल्ममधील 'चंद्रा'प्रमाणे 'चिराभरणी' गाण्यानेही
विशेष लक्ष वेधलं.

चिराभरणी पायाभरणी, घरभरणी अशा विधीसारखी वाटावी.

प्रत्यक्षात चिराभरणी अत्यंत तिरस्करणीय अशी एक कुप्रथा.

चिरा आणि भरणी
अशा दोन शब्दांपासून बनलेला शब्द.

चिरा म्हणजे कौमार्य,
भरणी म्हणजे कौमार्य नष्ट करण्याची विधी.

ज्याला चिरा उखळणं,
 चिरा उतरवणं
 असंही म्हटलं जातं.

कोल्हाटी समाजात
ही प्रथा आढळते. 

गावचे पाटील, देशमुख, मालदार असामी यांच्यात चिराभरणीसाठी चुरस लागते. 

काही ठिकाणी लिलाव बोली लागते. अलिखित कराराच्या स्वरूपात मागण्यांची पूर्तता होते.

धनधान्यं, जमीनजुमला, सोने याबदल्यात वरचढ बोली लावणाऱ्यास चिराभरणीचा बहुमान मिळतो

कायमची रखेल अथवा धंदा करण्यास मोकळी अशी व्यवस्था असते.

बहुतेक तमाशाच्या फडात
गावोगावी नाचण्यासाठी
 नव्या कोवळ्या कोल्हाटणी
 मोकळ्या होतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!