वजन मोजण्याची योग्य वेळ माहितीये?
वजन वाढणे ही सध्या अनेकांच्या आयुष्यातील मोठी समस्या आहे.
आपलं वजन वाढलंय की कमी झालंय यासाठी सर्वजण वजन काट्याचा वापर करतात.
वजन काट्यावरील वजन पाहिल्यानंतर सर्वांच्या कपाळाला आठ्या पडतात.
परंतु तुम्हाला माहितीये का की वजन मोजण्याची ही एक वेळ असते. यावेळी वजन मोजल्यास आपल्याला आपल्या शरीराचं योग्य वजन कळू शकत.
तज्ञांच्या सांगण्यानुसार वजन करण्यापूर्वी तुमचं ब्लॅडर रिकामं करावं, अन्यथा तुमच्या युरीनच वजन देखील यात गणलं जात.
तेव्हा नेहमी वजन करण्यापूर्वी तुम्ही मूत्रविसर्जन करून घ्या.
वजन करण्यापूर्वी तुमचं पोट रिकामं ठेवा. वजन करण्याआधी कॉफी, चहा, पाणी, तसेच कोणत्याही अन्नाचे सेवन करू नका.
दिवसभर हालचाल, व्यायाम केल्यानंतर संध्याकाळी तुम्ही वजन केल्यास ते नेहमी कमीच येत.
तेव्हा सकाळी उपाशी पोटी वजन मोजून ही वजन मोजण्यासाठी अतिशय योग्य वेळ आहे.
तुम्ही महिन्यातून एकदा वजन मोजत असाल तर ते पुरेसं आहे. रोज वजन मोजण्याची तशी गरज नाही.