ताप येतो तेव्हा शरीराचे तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त असते. 

शरीराचे तापमान जास्त असते तेव्हा याचा अर्थ असा होतो की शरीरात काहीतरी वेगळं घडत आहे. 

व्यायाम, उष्ण हवामान किंवा कोणत्याही लसीकरणामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. पण, ताप हा आजार नाही. 

ताप येणे म्हणजे शरीरातील सर्व गोष्टी नीट होत नसल्याचा तो संकेत आहे. 

ताप हा बॅक्टेरिया किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे येवू शकतो. ताप मोजण्यासाठी थर्मामीटर वापरला जातो. 

शरीराचे सामान्य तापमान 36.4 अंश सेल्सिअस किंवा 98.5 अंश फारेनहाइट असते. शरीराचे तापमान उन्हातून येताच किंवा थंड-गरम प्यायल्यानंतर लगेच मोजू नये.

कोरडी त्वचा, भूक न लागणे, अतिसार किंवा डोकेदुखी ही ताप येण्याची सुरुवातीची काही लक्षणे आहेत. 

हॉपकिन्स मेडिसिननुसार, शरीराचे तापमान वाढते तेव्हा आपल्या शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होऊ लागतात.

अति सर्दीच्या वेळी, उष्माघातामुळे आपले शरीर तापते, अशा स्थितीत ताप येणे स्वाभाविक आहे.

मात्र, कधीकधी ताप येण्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला फायदा देखील होतो. याद्वारे आपल्या शरीरातून बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट होतात.