चुकून च्युईंगम पोटात गेलं तर....
सगळ्यांच्या मनात हा प्रश्न नक्की आहे की खाताना च्युईंगम पोटात गेलं तर....
लहान मुलं च्युईंगम खातात तेव्हा मोठी माणसं सांगतात की ते पोटातील सर्व आतड्यांना चिकटून राहते आणि नंतर त्याचे इन्फेक्शन होते.
पण खरंचं असं होतं का? तुम्ही कधी विचार केला आहे का की चुकून च्युइंगम गिळल्यास काय होतं?
च्युइंगम्स लवचिक आणि चिकट असतात. त्यामुळेच तासनतास चघळल्यानंतरही त्यांचा आकार कमी होत नाही.
मग पोटात गेल्यावर देखील त्याला काहीही होणार नाही आणि ते पोटात चिकटून राहिलं, असं आपल्याला वाटतं. पण हे खोटं आहे
पोटात प्रवेश करणारे प्रत्येक अन्न पचवण्यासाठी पचनसंस्था एंजाइम सोडते. त्यानंतर याचं पोषकतत्त्वात रूपांतर होऊन रक्तात प्रवेश होतो.
जेव्हा आपण च्युइंगम खातो तेव्हा शरीराला ते पचवण्याची उर्जा नसते, त्यामुळे ते उर्वरित अन्नासह मलमधून बाहेर जाते.
च्युइंगम बाहेर जाण्यासाठी 12 ते 48 तास लागू शकतात. म्हणूनच जर तुम्ही चुकून च्युइंगम गिळले तर भरपूर पाणी प्यावे.
च्युइंगम खाणे धोकादायक देखील असू शकतं, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये ते आपल्या आतड्यांमध्ये त्रासदेखील देऊ शकते.
च्युइंगम गिळल्याने उलट्या, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि अतिसार होऊ शकतो.