सिलेंडरला आग लागली तर काय कराल?

भारतातील घरांमध्ये साधारणतः जेवण तयार करण्यासठी एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो.

परंतु काहीवेळा गॅस सिलेंडर बाबत योग्य खबरदारी घेतली नाही तर त्याला आग लागून मोठा स्फोट होण्याची शक्यता असते.

योग्य खबरदारी न घेतल्याने तसेच प्रसंगावधान न राखल्याने दरवर्षी अनेकजण आपला जीव गमावत आहेत.

तेव्हा सिलेंडर लीक होत असेल किंवा सिलेंडरला आग लागली तर काय करायला हवे हे जाणून घ्या.

किचन आणि घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडा.

गॅस रेग्युलेटर चेक करा, तो ऑन असेल तर लगेच बंद करा. जर रेग्युलेटर बंद केल्यानंतरही गॅस लीक होत असेल तर रेग्युलेटक काढून सेफ्टी कॅप लावा.

घरात जर एखादा दिवा किंवा अगरबत्ती सुरू असेल तर ते विझवून टाका. तसेच आपल्या डिलरशी संपर्क करा आणि त्याला याबाबत माहिती द्या.

गॅस लीक झाल्यानंतर सिलेंडरला आग लागली तर एखादी चादर किंवा टॉवेल लगच पाण्यामध्ये भिजवा. आणि ती लगेच सिलेंडरवर टाका. त्यामुळे आग लगेच विझण्यास मदत होईल आणि कोणतीही मोठी जीवितहानी होणार नाही.

तसेच असे करून देखील आग विजली नाही तर लगेच अग्निशमन दलाला याबाबत माहिती द्या.