शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचं काम मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी किडीनचं कार्य योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं.
जेव्हा तुमची किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसू लागतात. ती लक्षणं नेमकी कोणती पाहू.
रक्त स्वच्छ करण्यासोबतच किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचं काम करते.
काही प्रकरणांमध्ये शरीराची त्वचा कोरडी पडणं आणि खाज येणं, हे किडनी निकामी होण्याचं लक्षण असू शकतं.
लघवीतून रक्त - लघवी तयार करताना रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करते. पण जेव्हा किडनीचं फिल्टर खराब होते, तेव्हा लघवीमधून रक्त पडू लागते.
जेव्हा किडनी शरीरातून सोडियम योग्य प्रकारे बाहेर काढू शकत नाही, तेव्हा तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात ते जमा होते.
त्यामुळे हात, पाय, घोट्यावर किंवा चेहऱ्यावर सूज येऊ लागते. तुम्हाला तुमचा पाय आणि घोट्यावर सूज दिसू शकते.
सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम किंवा इतर इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीतील असंतुलन तुमच्या स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यामध्ये व्यत्यय आणू शकतात
जर तुमच्या लघवीमध्ये भरपूर फेस तयार होत असेल, तर लघवीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याचा हा इशारा आहे.
जर तुम्हाला एखादे लहान काम करतानाही थकवा जाणवत असेल, आणि तुम्ही संबंधित कामावर लक्ष केंद्रित करू शकत नसाल, तर हे खराब लक्षण आहे.
जेव्हा किडनी नीट काम करू शकत नाही, तेव्हा रक्तामध्ये विष आणि घाण जमा होऊ लागते. यामुळे लोकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
डोळे निरोगी ठेवण्यासाठी या 4 टिप्स
Click Here