सकाळी करा हे काम, सहज कमी होईल वजन!

आपलं वजन नियंत्रित आणि कमी असावं असं प्रत्येकाला वाटतं. 

रोज सकाळी काही नियम पाळल्यास तुम्ही वजन नियंत्रित ठेऊ शकता. 

सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यावा. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल आणि शरीर हायड्रेटेड राहील. 

सकाळी व्यायाम करणे पोटाची चरबी जाळण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. वेगवान चालणे, योगा, कठीण व्यायाम करावा. रोज सकाळी किमान 30 मिनिटे तरी व्यायाम करावा. 

सकाळी प्रोटीन रिच पदार्थ अंडी, ग्रीक दही किंवा प्रथिने स्मूदी यांचा आहारात समावेश करा. जेणेकरुन तुम्हाला अधिक कॅलरी जाळण्यात मदत होईल. 

जेवताना अन्नाकडे लक्ष द्या, प्रत्येक घासाचा आस्वाद घेणे आणि हळूहळू खाणे. यामुळे तुमचे पोट लवकर भरेल आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल. 

सकाळच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यास वजन कमी होते आणि पोटाची चरबी कमी होते. यामध्ये संपूर्ण धान्य, फळे, भाज्या आणि शेंगा निवडा तुम्ही खाऊ शकता. 

सकाळच्‍या दिनचर्येमध्‍ये मेडिटेशनचा समावेश केल्‍याने तणावाची पातळी कमी होते आणि यामुळे वजनावरही नियंत्रण राहाते. 

वजन नियंत्रण आणि एकूणच आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे भूक वाढते आणि चरबी साठली जाते.