पावसाळ्यात वापरा अशा फॅशनेबल फुटवेअर
फ्लिप फ्लॉप : रबर आणि प्लास्टिक पासून तयार केलेल्या या चपला स्लीपर सारख्या असतात. आता यामध्ये विविध डिझाईन्स आणि रंग बाजारात उपलब्ध आहेत.
फ्लिप फ्लॉप चपलांमध्ये पाणी जास्त काळ राहत नाहीत म्हणून हे पावसाळ्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
रबर सोल सँडल : या सँडलमध्ये अनेक डिझाईन आणि प्रकार उपलब्ध असतात. यामुळे तुम्हाला चांगली पकड मिळेल आणि तुमचे पाय पाण्याने ओले देखील होत नाहीत.
क्रॉक्स : क्रॉक्स जरी नजरेला हेवी दिसले तरी देखील ते वजनाला मात्र खूपच हलके असतात. तसेच ते दिसायला देखील खूप स्टायलिश दिसतात.
क्रॉक्स जीन्स, लोअर्स, शॉर्ट्ससोबत देखील खूपच मस्त दिसतात.
वॉटरप्रूफ बूट्स : हे बूट्स तुम्ही कोणत्याही आऊटफिटवर घातलेत तरी फॅशनेबल लुक्सच देतात.
पावसाळ्यात वॉटरप्रूफ बूट्स हे तुमचे पाय स्वच्छ आणि चिखलापासून दूर ठेवण्यात मदत करतात. हे आऊटफिटवर घालू शकता. यामध्ये तुम्हाला तुमचा लूक क्लासच दिसेल यात शंकाच नाही.
कंफर्टेबल स्ट्रप सँडल्स : स्ट्रप सँडल हे पावसाळ्यात वापरण्यासाठी अतिशय कंफर्टेबल असतात.
असे फुटवेअर पावसाळ्यात स्लिप होत नाहीत. तसेच फॅशनेबल लूक ही देतात.
फ्लोटर्स : फ्लोटर्स त्याच्या डिझाईनमुळे पायातून वारंवार निघत नाहीत, तसेच यामुळे पाण्यातून पाय स्लिप होण्याची शक्यता कमी असते.