भाज्यांच्या
बिया, साली, देठ
कचऱ्यात फेकण्याऐवजी
अशा वापरा
बऱ्याच भाज्यांची सालं आपण कचरा म्हणून फेकून देतो.
पण तुम्हाला माहिती आहे
या सालींचा बराच वापर होतो.
खरंतर या सालींमध्ये बरेच पोषक घटक असतात.
बटाट्याच्या साली बेसनमध्ये घोळवून भजी बनवू शकता.
बटाट्याप्रमाणेच
दुधी भोपळ्याच्या सालीचीही भजी करता येईल.
फ्लॉवरची पानं, देठ तुम्ही पुलावमध्ये टाकू शकता.
कोथिंबिरीचे देठ तुम्ही
सूपमध्ये टाकू शकता.
भोपळा, टरबूजाच्या बिया सुकवून त्या खीर, हलवा, मिठाईत वापरू शकता.
मटारच्या सालीची बटाटा घालून भाजी किंवा चटणीही बनवतात.