तुळशीजवळ ठेवू नका या 5 गोष्टी, नाहीतर व्हाल कंगाल
हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे बहुतेक हिंदू लोकांच्या घरातील अंगणात तुळशीचे झाड दिसते.
असे म्हंटले जाते की, ज्या घरात तुळशीचं झाडं असेल त्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो.
हिंदू शास्त्रानुसार तुळशीमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो.
त्यामुळे नियमित तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी सर्वांवर कृपा करते. आणि घराची भरभराट देखील होते.
काहीवेळा लोक तुळशीच्या जवळ अश्या काही वस्तू ठेवतात ज्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकते.
तेव्हा या 5 गोष्टी घरातील तुळशी वृंदावनाच्या जवळ ठेऊ नका.
तुळशीजवळ चप्पल बूट ठेऊ नये. याने घरात नकारात्मकता येते.
तुळशीजवळ अनेक लोक शिवलिंग देखील ठेवतात. परंतु असे करणे अयोग्य आहे. यामुळे घरात अनेक संकट येऊ शकतात.
तुळशीजवळ झाडू आणि कचरा पेटी ठेऊ नये. यामुळे घरात दरिद्री येते.
शास्त्रानुसार तुळशीजवळ काटेरी झाड ठेवू नये, यामुळे नकारात्मकता येते.
वास्तुशात्रानुसार गणपतीची मूर्ती देखील तुळशीच्या जवळ ठेऊ नये.