घराच्या मुख्य दाराबाहेर ठेऊ नका या गोष्टी, होईल आर्थिक नुकसान

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा घरात येणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा स्रोत असतो.

परंतु आपण बऱ्याचदा घराच्या मुख्य दरवाजाजवळ अशा काही गोष्टी ठेवतो ज्यामुळे लक्ष्मी रूसते.  त्यामुळे घराची आर्थिक स्थिती खराब होते.

तेव्हा तुम्हाला धनहानी नको असेल तर घराच्या मुख्य दरवाज्याजवळ काही गोष्टी ठेवणे टाळा.

घराच्या मुख्य दरवाजावर चुकूनही तुम्ही चप्पल ठेऊ नका. तसंच तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ चपलांचे कपाटही ठेऊ नका. असं केल्यामुळे लक्ष्मीचे येणे बंद होत आणि घरात आर्थिक हानी होऊ लागते.

घराच्या सजावटीसाठी मनी प्लांट घराच्या मुख्य दरवाजापाशी ठेवतात. मात्र असं करणे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही.

मनी प्लांट हे पैशाचे झाड मानले जाते आणि मुख्य दरवाजाजवळ ठेवल्याने यावर सर्वांची नजर जाते. तसेच घरातील मुख्य दरवाजावर काटेरी झुडपंही लाऊ नयेत.

घराच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीची कोणत्याही पद्धतीची मूर्ती अथवा चित्र लाऊ नये. कारण लक्ष्मीचे मुखही बाहेरच्या दिशेने असणे चांगले नाही. आतील संपत्ती बाहेर जाऊ लागते असंही म्हणतात.

घरातील मुख्य दारासमोर कचरापेटी ठेऊ नये. कारण लक्ष्मी ही घराच्या प्रवेशद्वारानेच आत येत असते.

कचरा असेल त्या ठिकाणी लक्ष्मी वास्तव्य करत नाही असा समज आहे.

बऱ्याचदा काही जण आपल्या घरातील तुटलेले सामान बाहेर काढल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशदाराजवळ ठेवतात.

पण असे केल्याने आर्थिक हानी होऊ शकते. घरातील आर्थिक स्थिती व्यवस्थित ठेवायची असेल तर कधीही तुटलेले छोटे मोठे सामान मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेऊ नये.