आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वास्तू टिप्स

लक्ष्मी आणि सरस्वती घरात येण्यासाठी चांदीचा नाचणारा मोर घरात ठेवावा. 

चांदीचा मोर वैवाहिक जीवनात प्रेम आणि शांती आणतो आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी करतो. 

आर्थिक समस्या जाणवणाऱ्या व्यक्तींनी ऑफिसच्या आग्नेय कोपऱ्यात चांदीचा मोर ठेवावा.

त्यामुळे घरात पैशांच्या तुटवड्याशी सामना करावा लागत नाही. 

रोख रकमेचा लॉकर घराच्या दक्षिण किंवा नैर्ऋत्येकडच्या भिंतीत असावा आणि लॉकरचं दार उत्तर दिशेला उघडावं. 

लॉकरचं दार उत्तर दिशेला उघडत असेल, तर तो लॉकर कधीही रिकामा होणार नाही, याची व्यवस्था देव करतो. 

संपत्तीची देवता असलेल्या कुबेरासाठी उत्तर ही उत्तम दिशा आहे. 

कुबेराला संपत्तीची देवता मानलं जातं. योग्य वास्तू टिप्सच्या आधारे तुम्ही संपत्ती आकर्षित करून घेऊ शकता. 

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की वाईट मार्गांनी मिळवलेला पैसा कधीच तुमच्यासोबत राहत नाही.