उत्पत्ती एकादशी ही एकादशीचे व्रताची सुरुवात मानली जाते.

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते. 

उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचे दर्शन होते, म्हणून या दिवसापासून एकादशीचे व्रत केले जाते.

या व्रताला भगवान विष्णूने सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ होण्याचे वरदान दिले आहे.

ज्यांना एकादशीचा उपवास वर्षभर करायचा आहे, त्यांनी उत्पत्ती एकादशीला व्रताची सुरुवात करावी. 

 वार्षिक व्रत सुरू करण्यासाठी उत्पत्ती एकादशी हा सर्वोत्तम दिवस आहे. 

म्हणजे थोडक्यात ज्यांना एकादशीचा उपवास करायचा आहे त्यांनी या एकादशीपासून सुरू करणं अधिक लाभदायी ठरेल.

उत्पत्ती एकादशीच्या दिवशी प्रीती योग, आयुष्मान योग, द्विपुष्कर योग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे पाच शुभ योग तयार होत आहेत. 

पौराणिक कथेनुसार, एकादशी माता उत्पत्ती एकादशीच्या तिथीला अवतरली होती, म्हणून या एकादशीला उत्पत्ती एकादशी व्रत म्हणतात.

धार्मिक आख्यायिकांनुसार, देवी एकादशीने भगवान विष्णूच्या अंशातून जन्म घेऊन मुरा या राक्षसापासून भगवान विष्णूचे प्राण वाचवले होते.