जुना टूथब्रश फेकून देताय? थांबा.. करा असा उपयोग

टूथब्रश वापरून जुना झाल्यावर तो आपण फेकून देतो. परंतु तसे न करता त्याचा घरातील लहानसहान कामांसाठी उपयोग होऊ शकतो. 

दोन टाईल्समध्ये साचलेली घाण घासून स्वच्छ करण्यासाठी जुना टूथब्रश उपयोगी ठरतो.

घरच्या घरी हातापायांवरील नखांची स्वच्छता करायची असेल तर टूथब्रश वापरता येतो.

लॅपटॉप किंवा कॉम्पुटरच्या कि-बोर्डवर साचलेली धूळ जुन्या टूथब्रशने स्वच्छ करता येते. 

केसांना डाय करण्यासाठी जुन्या ब्रशचा चांगला उपयोग होऊ शकतो.

सोने चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी जुन्या टूथब्रशचा चांगला उपयोग होऊ शकतो.

घरातील नळांवरील घाण स्वच्छ करण्यासाठी टूथब्रशची मदत होऊ शकते.

रोजच्या वापरातील पाण्याच्या बाटल्या आतून स्वच्छ करण्यासाठी जुना टूथब्रश उपयोगी ठरू शकतो. 

खिडक्यांवरच्या जाळ्यांची लहान छिद्र स्वच्छ करण्यासाठी जुना टूथब्रश उपयोगी ठरू शकतो.