विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची बरीच प्रकरणं आहेत.
पण विषारी दारू म्हणजे त्यात थेट विष मिक्स केलं जात नाही.
तर त्यात एक प्रकारचं मिथाइल अल्कोहोल असतं.
जे शरीरात जाताच फॉर्माल्डिहाइड किंवा फॉर्मिक अॅसिड नावाचं विष तयार होतं.
या दारूचा थेट मेंदूवर परिणाम होतो, शरीरातील अवयव काम करणं बंद करतात.
दारू तयार करण्याची चुकीची पद्धत तिला विषारी बनवते.
ही दारू तयार करणारे चुकीच्या, बेकायदा मार्गाने डिस्टिल करतात.
डिस्टिलिंगची प्रक्रिया खूप कठीण. ती केवळ तज्ज्ञच करू शकतात.
इथाइल, मिथाइल वेगळं करण्याबाबत माहिती असणं गरजेचं आहे.
या प्रक्रियेत शरीरासाठी घातक असलेल्या रसायनांचा वापर होतो.
त्यामुळे अशी दारू प्रसंगी मृत्यूसाठी कारणीभूत ठरते.