टूथपेस्टवरील 'या' रंगीत चिन्हाचा नेमका अर्थ काय?
तुम्ही टूथपेस्टवर वेगवेगळ्या रंगाचे चिन्ह पाहिलं असेल, पण त्याचा नेमका अर्थ काय, ते का दिलं जातं, असा कधी विचार केलाय?
अनेक व्हायरल माहितीनुसार टूथपेस्टमध्ये केमिकल किंवा नैसर्गिक घटक आहेत, हे ओळखण्यासाठी या चिन्हाचा वापर होतो
या रंगांचा केमिकलच्या माहितीशी काही संबंध नाही
व्हायरल माहितीनुसार रंग आणि त्याची माहिती घेऊ
1 हिरवा रंग : पूर्णपणे नैसर्गिक
2 निळा रंग : नैसर्गिक आणि औषधी मिश्रण
3 लाल रंग: नैसर्गिक आणि केमिकल
4 काळ्या रंग : पूर्णपणे केमिकलयुक्त
पण टूथपेस्टवरिल रंगीत चिन्हाचा वास्तविक अर्थ असा अजिबात नाही
टूथपेस्टवरिल रंग कोडचा खरा अर्थ काय?
हे मार्क प्रोडक्टच्या प्रोडक्शनच्या वेळी छापले जाते. हे कलर कोड लाईट बीम सेन्सर्सद्वारे वाचता येतात
हे रंगीत चिन्ह पॅकेजिंगबद्दल माहिती देते. यामुळे सेन्सर्सला कळतं की टूथपेस्ट कुठे कापायची आहे किंवा दुमडायची आहे
त्यामुळे हे कोड फक्त पॅकेजिंगच्या कामासाठी वापले जाते, त्याचा त्यातील घटकांशी काहीही संबंध नाही