दातदुखीवर घरगुती प्रभावी उपाय!
थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना दातदुखीमुळे असह्य वेदना होतात.
ज्यांचे दात असे खूप संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना खूप त्रास होतो.
वेदना कमी करण्यासाठी टूथपेस्ट बदला. खास टूथपेस्ट आणि मऊ ब्रिसल्स असलेला ब्रश वापरा.
आंबट पदार्थ खाणे बंद करा किमान त्याचे प्रमाण कमी करा.
व्हाईटनिंग टूथपेस्ट किंवा अल्कोहोलयुक्त आधारित माऊथवॉश वापरल्यास समस्या वाढू शकते.
रात्री जेवल्यानंतर 20 मिनिटांनी दात घासा. आधीच दात घासण्याची सवय असेल तर दातांवर टूथ गार्ड लावा.
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने संवेदनशील दातांची समस्या कमी होते.
घरगुती उपायांनी तात्पुर्त आराम मिळेल. मात्र जास्त त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.