आपल्या दररोजच्या वापरातील टोमॅटो नक्की फळ आहे का भाजी हे अनेकांना माहित नाही.
टोमॅटोच्या वापराशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होत नाही.
टोमॅटो फळ आहे की भाजी याविषयी अनेक संशोधन केलं गेलंय.
बहुतेक संशोधनांत टोमॅटो फळ असल्याचं सांगण्यात आलं तर काहींमध्ये भाजी.
त्यामुळे टोमॅटोला फळभाजी म्हटलं जातं.
टोमॅटोमध्ये फळ आणि भाजी दोन्हींचे गुणधर्म आढळतात.
टोमॅटोचे अनेक फायदे आहेत. याचं सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
जगभरात टोमॅटोच्या 9000 जाती आहेत.
टोमॅटोची पहिली लागवड पेरुमध्ये झाली होती.