आपल्या परिसरात पावसाचं पाणी साठलं की, डासांची समस्या उद्भवते.
घरात डासांचं प्रमाण वाढलं की, अनेक आजार होण्याची शक्यता असते. या टिप्स अंमलात आणा आणि डासांना पळवून लावा.
घरात कापूर जाळा, यावेळी घराचे दार आणि खिडक्या बंद ठेवा. कापराच्या वासाने डास दूर पळतील.
लसणाची पेस्ट पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे डास दूर पळविण्यास मदत करतात.
लॅव्हेंडरचं तेलाचा वास डासांना सहज बाहेर पळवून लावतो. घरातील कोपऱ्यांमध्ये लॅव्हेंडरचं तेल शिंपडा.
बडीशेप आणि मोहरीचं तेलाचं मिश्रण करा, ते मिश्रण एखाद्या लाकडी तुकड्यावर लावून कोपऱ्यात ठेवून द्या. त्याने डास जातात.
लिंबू आणि निलगिरीचं तेल यांचं मिश्रणही घरात शिंपडल्याने डास पळून जातात.
कडूलिंबाचं तेल आपल्या शरीरावर लावलं की, डास चावत नाहीत.
जर तुमच्या घरात डासांचा त्रास जास्त असेल, तर वरील उपाय तुमच्या फायद्याचे आहेत.