नखांची वाढ लवकर होण्यासाठी खास टिप्स
बऱ्याच महिलांची इच्छा असते की त्यांची नख ही लांब असावीत.
काही महिला लांब नखांसाठी नेल एक्सटेंशन लावतात.
पण तुम्ही काही टिप्सचा वापर करून नैसर्गिकपणे नख वाढवू शकता.
1. अंड आणि दोन मोठे चमचे दूध घ्या.
अंड आणि दुधाचे मिश्रण एकजीव करून काहीवेळ हाताची नख त्यात बुडवून ठेवा. याने नख लवकर वाढण्यास मदत होईल.
एका वाटीत एक चमचा लसूण पेस्ट आणि एक चमचा अँपल साईडर विनेगर टाका.
आता हे मिश्रण तुमच्या नखांवर 10 मिनिटे लावून ठेवा.
3 . ताज्या संत्र्याच्या रसात 10 मिनिटे नख बुडवून ठेवा. संत्र्याच्या रसामुळे नखांची वाढ चांगली होईल आणि नखांना चमक येईल.
4. एक चमचा लिंबू रसात 3 चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. या मिश्रणात 10 मिनिटे नख बुडवून ठेवा.