15 दिवसांत 5kg वजन कमी होणार; हा डाइट फाॅलो करा

आताच्या काळात वजन वाढणं ही माणसाच्या जीवनातील मोठी समस्या झाली आहे. 

प्रत्येक वजन कमी करण्यासाठी धडपडत असतो. नवनवीन डाइट फाॅलो करत असतो. 

आज आपण 15 दिवसांत 5 किलो वजन कमी होणारा डाइट पाहणार आहोत. 

आलं आणि बडीशेप गरम पाण्यात घालून ग्लासभर पाणी पहाटे प्या. त्याने फॅट लवकर बर्न होते. 

सकाळी 8.30 वाजता नाश्त्यामध्ये पोहे खा. त्यात फायबर असते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. 

11 वाजता मुठभर सुर्यफुलाच्या बी आणि नारळ पाणी घ्या. यामध्येही फायबर असते. 

दुपारी 1 वाजता ब्राऊन राइस आणि डाळ खा. तसेच सलाडदेखील खा. 

4 वाजता एक ग्लास ताक प्या. त्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन आणि आवश्यक खनिजं असतात. 

संध्याकाळी 7.30 वाजता व्हेजिटेबल सूप, चिकन सूप किंवा क्लियर सूप आहारात घ्या. झोपताना ग्रीन टी घ्या.