वजन कमी करण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात, पण सर्वानाच यश मिळते असे नाही.
आज आम्ही तुम्हाला अशा एका चहाबद्दल सांगणार आहोत, जो वजन कमी करण्यात मदत करेल.
आपल्या सर्वांच्याच घरात उपलब्ध असलेल्या दालचिनीपासून हा चहा बनतो.
दालचिनीचा चहा प्यायल्याने वजन कमी करणे सोपे जाते आणि वेळी कमी लागतो.
पातेल्यात थोडे पाणी घेऊन त्यात दालचिनी टाकून उकळवा.
पाणी उकळल्यानंतर त्यात लिंबू आणि मध टाकून 5 मिनिटांनी गाळून घ्या.
थोडे थंड झाल्यावर तुम्ही या चहाचा आनंद घेऊ शकता.
नियमित हा चहा प्यायल्याने तुम्हाला तुमच्या वजनामध्ये नक्कीच फरक दिसेल.