नवीन वर्षाच्या सुरुवातीला बदलणार हे नियम

चेक पेमेंट सिस्टम - चेकद्वारे 50 हजार रुपये व त्याहून अधिक रक्कम भरल्यास पॉझिटिव्ह पे सिस्टिमअंतर्गत माहिती दोनदा कन्फर्म करावी लागेल. 

कॉन्टॅक्टलेस कार्ड ट्रान्झॅक्शन - आरबीआयनं (RBI) कॉन्टॅक्टलेस म्हणजे विना पिन कार्ड ट्रान्झॅक्शन मर्यादा दोन हजार रुपयांवरून पाच हजार रुपये केली आहे. 

कार होणार महाग - कार कंपन्या आपल्या अनेक मॉडेल्सच्या किंमती वाढवणार आहेत. आतापर्यंत मारुती, महिंद्रा, एमजी मोटरनं घोषणा केली आहे.

फास्टॅग बंधनकारक - नवीन वर्षात नॅशनल हायवेवर बिना फास्टॅग गाडी चालवल्यास दुप्पट टोल द्यावा लागेल. सध्या 20 टक्के लाईन्सवर कॅशला परवानगी.

शून्याचा वापर बंधनकारक - लँडलाईनवरून मोबाईलवर फोन करताना मोबाईल क्रमांकाच्या अगोदर शून्य आकडा वापरावा लागेल. 

म्युचुअल फंड नियमांत बदल - नवीन नियमांनुसार, 75 टक्के फंड इक्विटीमध्ये गुंतवणे आवश्यक. 

UPI पेमेंटमध्ये बदल - 1 जानेवारी 2021 पासून युपीआय पेमेंट केल्यास त्यावर चार्जेस लागणार आहेत. 

जीएसटी रिटर्नचे नियम बदलणार - नवीन जीएसटी नियमांनुसार, 5 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योजकांना दरमहा रिटर्न भरण्याची गरज नाही. 

सरल इन्शुरन्स पॉलिसी लॉन्च - 1 जानेवारीनंतर कमी प्रीमियमवर विमा खरेदी करता येईल. आयआरडीएआयनं सर्व कंपन्यांना त्यासंबंधी आदेश दिले आहेत.

व्हॉट्सअॅप होणार बंद - येत्या 1 तारखेनंतर काही अॅन्ड्रॉईड आणि आयएसओ फोनवर व्हॉट्सअॅप ही मेसेंजर सेवा कदाचित बंद होऊ शकते.