उन्हाळ्यातील या चुका करतील तुम्हाला आजारी!

रोजच्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला आजारी करू शकतात. बऱ्याचदा आपल्याला याबद्दल माहिती नसते. 

उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या काही चुका आजारपणाला आमंत्रण ठरू शकतात. 

थंड पाणी प्यायल्याने हायड्रेशनची समस्या होऊ शकत. तसेच यामुळे पचन अग्नी मंदावतो, यामुळे पोटाचे त्रास उद्भवतात. 

थंड ड्रिंक्स प्यायल्याने अनेक प्रकारच्या समस्या जसे की, मानेमध्ये वेदना, सायनुसायटिस हा त्रास होऊ शकतो. 

मसालेदार पदार्थ खाल्याने उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते, हे पचनक्रिया देखील बिघडवते. 

उन्हाळ्यात हेव्ही वर्कआऊट केल्यास आरोग्याला अनेक प्रकारे त्रास होण्याची शक्यता असते. 

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दारू प्यायल्यास पित्त असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे सूज येण्याची समस्या होऊ शकते. 

उन्हाळ्यात जास्त फॅट असलेले पदार्थ खाल्यास पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

उष्ण वातावरणात चहा कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यास डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.