या व्यक्तींनी बदाम खाणे टाळावे 

बदाम आरोग्यासाठी चांगले असले तरी काही आजार असलेल्या लोकांसाठी मात्र ते खाणे धोकादायक ठरू शकते.

तेव्हा कोणत्या व्यक्तींनी बदाम खाणे टाळावे हे जाणून घेऊयात.

लठ्ठपणा : वजन कमी करत असलेल्या लोकांनी बदाम खाऊ नये. यामध्ये भरपूर कॅलरीज आणि फॅट्स असतात.

अ‍ॅसिडिटी : ज्या व्यक्तींना वारंवार अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो त्यांनी  बदाम खाणे टाळावे.

अँटीबायोटिक औषधे : अँटीबायोटिक औषधे घेत असाल तरी तुम्ही बदाम खाणे टाळा. कारण यामध्ये मॅग्नेशियम असल्याने सेवनानंतर त्रास होऊ शकतो.

पचनाची समस्या : बदाममध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. अशावेळी पचनाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी बदाम खाल्ले तर त्यांचा त्रास वाढू शकतो.

किडनी स्टोन : ज्या लोकांना किडनी स्टोन किंवा पित्ताशयाची समस्या आहे अशा रुग्णांनी बदाम खाणे टाळावे.

उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी बदाम खाणे टाळावे.