ताजमहाल किती
प्रकारच्या दगडांनी बनवण्यात आला?
आग्र्यातील ताजमहाल हा जगातील सातव्या आश्चर्यांपैकी एक आहे.
मुघल शासक शाहजहाननेआपली पत्नी मुमताजच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ शुभ्र संगमरवरी महाल उभारला ज्याला ताजमहाल असे नाव दिले.
ताजमहाल एका अद्भुत कारिगरीचे उदाहरण आहे. ज्याला पाहण्यासाठी जगभरातील लोक येत असतात.
ताजमहाल चे बांधकाम सन 1631-53 पूर्ण दरम्यान करण्यात आले.
उस्ताद अहमद लाहौरी हे ताजमहालचे आर्किटेक्ट होते.
ताजमहाल हा 42 एकर जागेत बांधण्यात आला असून त्याची उंची 240 फूट आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ताजमहाल बांधण्यासाठी तब्बल 28 प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे.
ताजमहाल बांधण्यासाठी वापरण्यात आलेली दगड ही बगदाद, अफगाणिस्थान, तिब्बत , मिश्र, रुस आणि इराण इत्यादी देशांमधून आणण्यात आली होती.
ताजमहालच्या बांधकामासाठी, मध्य आशिया, तुर्की, रशिया आणि इराण यांसारख्या विविध राष्ट्रांमधून सुमारे 37 तज्ञ कारागीर भारतात पाठवण्यात आले होते. तर तब्बल 20 हजार कामगारांनी मिळून हा ताजमहाल बांधला होता.